साई दरबार हॉटेलची स्थापना प्रामुख्याने उत्कृष्ट पाहुणचार आणि चविष्ट जेवण  देण्यासाठी करण्यात आली. व्हेज आणि नॉन-व्हेज जेवणासाठी  स्वतंत्र इमारती असून , प्रत्येक पाहुण्याला समाधानकारक अनुभव मिळावा याची आम्ही खात्री घेतो. आमचं उद्दिष्ट म्हणजे केवळ एक हॉटेलच नव्हे तर एक अशा जागेचं निर्माण करणं जिथे प्रवासाची थकलेली पावलं आणि तुमच्या आनंदाच्या क्षणांचं स्वागत केलं जातं.

दृष्टीकोन

परिपूर्ण पाहुणचाराच्या माध्यमातून साई दरबारला भेट देणाऱ्या  प्रत्येक व्यक्तीचा  अनुभव  अधिक स्मरणीय बनवणे

उद्दिष्टे

 

शुद्ध आणि दर्जेदार अन्न पुरवणे.

पर्यटन व पाहुणचार क्षेत्रात एक आदर्श निर्माण करणे.

प्रत्येक सण, लग्न किंवा इतर खास प्रसंगी अविस्मरणीय क्षण निर्माण करणे .

  • स्वादिष्ट भोजनासाठी स्वतंत्र इमारती:
    • शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसाठी वेगवेगळ्या सुविधा.
  • आरामदायी खोल्या:
    • विनामूल्य वाय-फाय, स्वच्छता, आणि सेवेची पूर्ण काळजी.
  • मोकळी जागा:
    • थंडावा आणि उत्साह अनुभवण्यासाठी खुले वातावरण.
  • वाढदिवस, साखरपुडा आणि लग्न समारंभासाठी हॉल:
    • मोठ्या किंवा छोट्या कार्यक्रमांसाठी खास जागा.